ताज्या घडामोडी

अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करत मागितली खंडणी ; सहा जणांना अटक 

पुणे : पुण्यातील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .अॅपचा वापर करून आरोपींनी पवार यांच्या नावाने फोन करत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील एका बड्या बिल्डरला आरोपींनी उपमुख्यमंत्र्यांचा पी.ए. बोलत असल्याचे सांगणारा फोन केला. अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करत आरोपींनी 20 लाखाची खंडणी मागितली. त्यातील 2 लाख रुपये आरोपींनी घेतले.

याप्रकरणी आयपीसी कलम 384, 386, 506, 34 आयटी अॅक्ट कलम 66 (सी ),(डी ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!