ताज्या घडामोडी
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज (दि. 2 फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.ते 93 वर्षांचे होते.
30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव व अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापुरात झाला. 1956 साली त्यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.