ताज्या घडामोडी

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी साधला वस्त्रोद्योग व्यवसायिक यांच्याशी संवाद

इचलकरंजी : येथील फुलचंद शहा गार्डन येथे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्यासह आज वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणी, समस्या संदर्भात यंत्रमाग संघटनांचे प्रतिनिधी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी तसेच विविध यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि वस्त्रोद्योग व्यवसायिक यांच्याशी संवाद साधला.

वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असावी या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्वांनी जुन्या दराप्रमाणेच वीज बिले भरावीत. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना ७५ पैसे अतिरिक्त वीज बील सवलत देण्याबाबत येत्या महिन्याभरात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल अशी चर्चा यावेळी झाली.

वस्त्रोद्योगातील प्रत्येक घटकांची माहिती एकत्रित संकलित झाल्यास या घटकांसाठी योजना राबविणे, त्यांना मदत करणे सुलभ होणार आहे. यासाठी प्रत्येक घटकांची नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्वांशी चर्चा केली जाईल. वस्त्रोद्योगाला बळ देण्याचे शासनाचे धोरण असून वस्त्रोद्योगाबरोबरच व्यापार, शेती यासारख्या क्षेत्रातील फसवेगिरीला चाप घालण्यासाठी नवीन कायदा आणण्याचा सरकारचा मानस आहे. यंत्रमागधारकांची वीज कनेक्शन खंडीत करु नयेत अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे, इंडस्ट्रियल इस्टेटचे राहूल खंजिरे, यंत्रमाग संघटनेचे मदन कारंडे, विनय महाजन, सतीश कोष्टी, राजगोंड पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सागर चाळके, रविंद्र माने, राहुल आवाडे, संजय कांबळे, कैश बागवान, महादेव कांबळे, नितीन जांभळे यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी, यंत्रमागधारक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!