ताज्या घडामोडी

बेकायदेशीर वृक्षतोड करणारा ‘कोण आहे पुष्पा’? चौकाचौकात लागलेल्या फलकांची शहरभर चर्चा 

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरात होणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात तळेगाव शहरातील नागरिक व वृक्षप्रेमी संताप व्यक्त करत आहे. शहरभर कोण आहे पुष्पा ? असे फलक झळकत आहेत. वृक्षतोडी मागे नेमका कोणाचा हात आहे याचा कर्ता-करविता कोणी बांधकाम व्यवसायिक की कोणी माजी नगरसेवक एखादा लोकप्रतिनिधी की प्रशासकीय अधिकारी अशी चर्चा शहरात सुरू आहे.

नागरिकांच्या मनातील खदखद या फलकांच्या माध्यमातून जनसेवा विकास समितीने मांडली आहे. नगरपरिषद हद्दीत कृष्णा आकार सोसायटीच्या मागच्या बाजूस नैसर्गिक ओढ्यालगत असलेली अनेक झाडे विनापरवाना तोडण्यात आली. तर काही ठिकाणी विनाकारण झाडे तोडण्यात आल्याची घटना जागरूक नागरिकांनी निदर्शनास आणली. त्यानंतरही नगरपरिषद  प्रशासन सदर घटनेची दखल घेत नसल्याचे आरोप झाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत कटारिया अँन्ड ईगल इन्फ्रा, कुमार इलेक्ट्रिकल्स अँन्ड इंजिनियर्स, सुर्या राठोड यांना नोटीस बजावण्यात आली.या नोटीशीत सात दिवसात लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.व विहित वेळेत खुलासा सादर न केल्या  महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम 1975 व सुधारणा अधिनियम 2021चे कलम 21 (1 )अन्वये कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.

माञ सर्वकाही माहित असताना नागरिकांनी ओरड केल्या नंतर कार्यवाही करण्याचे नाट्य उभे केले जाते का ?अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. या मागचा खरा चेहरा समोर येणार का? याचे उत्तर चौकाचौकात झळकणाऱ्या फ्लेक्सच्या माध्यमातून कोण आहे पुष्पा या मथळ्याखाली विचारला जात आहे .विशेष म्हणजे हे फ्लेक्स लावताना रीतसर नगर परिषदेचे शुल्क भरून लावले आहे. त्यामुळे कोण आहे पुष्पा हे समोर येणार का ?त्यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!