ताज्या घडामोडी

कामशेत शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

कामशेत : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन कामशेत शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने कामशेत बाजारपेठ या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली .

यावेळी कामशेत पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व संपूर्ण बाजारपेठेत व्यापारी, पथारी धारक, नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल शेख ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन अध्यक्ष संजय वाघमारे, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड ,कार्याध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव महिंद्र वंजारी, मिलिंद घोडके , कुणाल ओव्हाळ , विजय गायकवाड, संतोष गायकवाड, प्रवीण अहिरे, राजू गायकवाड, विजय वाघमारे, किशोर ओव्हाळ , राम वाघमारे, उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!