ताज्या घडामोडी
स्वामीनारायण मंदिर यांच्यावतीने लोणावळ्यात कपडे व धान्य वाटप
लोणावळा : आज (25फेब्रुवारी) रोजी माणिनगर स्वामी नारायण गादी संस्थान व स्वामी नारायण मंदिर (महालक्ष्मी )मुंबई यांच्या वतीने व कमलशील आनंद म्हस्के लोणावळा शहर अध्यक्ष RPI (आठवले ) यांच्या प्रयत्नातून लोणावळा इ वॉर्ड सिद्धार्थनगर येथे आचार्य गित्नेंद्रप्रिय स्वामी,दिवयदर्शन स्वामी व संत गं यांच्या हस्ते धान्य व कपडे वाटप करण्यात आले.
सिद्धार्थनगर येथील सुमारे २०० परिवारांना धान्य,लहान मुलांना कपडे ,महिलांना साडी वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाई ,कयलाश गुंड ,प्रफुल काकडे,किशोर गायकवाड मुना उठवलं ,केतन गायकवाड,गिरीष म्हस्के,सुधीन उजगरे,स्वप्नील जाधव,योगेश पाटोळे,प्रणव पवार,बबलू कदम,आदित्य भालेराव,सुमित जाधव,वैभव झोडगे,संतोष बनसोडे आदी उपस्थित होते.