ताज्या घडामोडी
रिंगरोड साठी मावळातील पाच गावांचा दर निश्चित
पुणे : जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत रिंगरोड साठी अखेर मावळ तालुक्यातील पाच गावांसाठी दर निश्चित झाला आहे. यामुळे पुढील पंधरा दिवसात रिंगरोड साठी पहिले खरेदीखत होण्याची शक्यता आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. यासाठी तीन दिवसांची समृद्धी महामार्गासाठी काम केलेल्या काही प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी पुण्यात येऊन कार्यशाळा घेतली.
जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मावळ तालुक्यातील पाचाणे, बेबडओहळ धामणे, परंदवडी, उर्से या पाच गावांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.