ताज्या घडामोडी
कुख्यात गुंड गजानन मारणे तुरुंगातून बाहेर
नागपूर : कोथरूड परिसरातील गुंड गजा मारणे तुरुंगातून बाहेर आला आहे.वर्षभरापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करत त्याला नागपूर कारागृहात पाठवले होते.
काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी मारणे याच्यावर कारवाई करत आधी त्याला येरवडा कारागृहात नंतर नागपूर जेलमध्ये पाठवले होते.कारवाईची मुदत संपल्याने त्याला मुक्त करण्यात आल्याची माहिती वकिलांनी दिली.