ताज्या घडामोडी

लोणावळा मनसेच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

लोणावळा: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने व मोरया ब्लड बँक चिंचवड यांच्या सहकार्याने मनसे अध्यक्ष  भारत रमेश चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत  39 रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान केले.

याप्रसंगी रुपेशभाऊ म्हाळसकर (तालुका अध्यक्ष), सचिन भांडवलकर (जि.अध्यक्ष रस्ते आस्थापना), तानाजी तोडकर, रमेशभाऊ म्हाळसकर , योगेश हुलावळे,् संजय शिंदे, निखील भोसले, अमित भोसले,  दिनेश कालेकर, सुशिल पायगुडे, अभिजित फासगे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!