ताज्या घडामोडी

मोशीत 23 ते 27 मार्च रोजी भरणार देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन

पिंपरी : देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ 23 ते 27 मार्च 2022 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी, भोसरी जवळ पुणे येथे भरणार आहे. या प्रदर्शनात 15 एकर क्षेत्रावर तीनशेहून अधिक कंपन्या संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

किसान प्रदर्शनाल कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थांचा ही प्रदर्शनात सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेल्या नवीन तंत्रज्ञानाची व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील.प्रदर्शन प्रवेशासाठी नाव नोंदणी शुल्क 150 रुपये आहे. पूर्व नोंदणीची सुविधा किसान मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020- 30252000 या क्रमांकावर अथवा                 www.kisan.in या वेबसाईटवर संपर्क करता येईल.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!