ताज्या घडामोडी

रोटरीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माहेरची साडी हा अभिनव उपक्रम

तळेगाव: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहेरची साडी व ज्येष्ठ माता भगिनींचा सन्मान सोहळा हॉटेल ईशा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहित शिंदे यांनी महिलांना आरोग्यविषयक अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते माता भगिनींचा सन्मान करण्यात आला.फुलाबाई काळोखे,  पुष्पा वसंतलाल मेहता, कमल कृष्णाजी देशमाने,  केशरबाई शिवाजी कडलक, शारदा यशवंतराव दाभाडे, लक्ष्मीबाई रघुनाथ शेंडे,सुषमा जीवन नांदगावकर व  मीराताई दशरथ फल्ले यांचा माहेरची साडी, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर  गडसिंग साहेब,  दीपक फल्ले,  सुरेश दाभाडे व  किरण ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख  शरयू देवळे, प्रास्ताविक शाईन शेख, स्वागत  रेश्मा फडतरे तर आभार  वैशाली खळदे यांनी मानले.

कार्यक्रमाचे नियोजन  रिजवाना शेख , सुरेश शेंडे, संजय मेहता,  बाळासाहेब रिकामे , संतोष शेळके,  प्रशांत ताय,  डॉ मिलिंद निकम , अविनाश नांगरे,  संतोष परदेशी  डॉ सौरभ मेहता, रोहित मणियार, राजेंद्र कडलक,  सुनील महाजन व  सुमंत जगताप यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!