ताज्या घडामोडी
तुंगार्लीत श्री जाखमाता देवी उत्सवानिमित्ताने पालखीची मिरवणूक व कुस्त्यांचा जंगी आखाडा
लोणावळा : तुंगार्लीतील श्री जाखमाता देवीचा उत्सव पालखीच्या मिरवणुकीने व कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून गावोगावच्या जत्रा उरूस यावर बंदी आली होती. परंतु यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने व निर्बंध शिथिल झाल्यामुळे गावोगावी जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
काल (दि. 22 )रोजी रात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच रात्री सात नंतर ‘नाद खुळा’ हा कार्यक्रम रंगला. आज दुपारी झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी नामवंत पहिलवानांची कुस्ती रसिकांना पाहायला मिळाली.जञेत मोठ्या प्रमाणात लावलेल्या खाद्यपदार्थांच्या तसेच खेळण्यांच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली.