ताज्या घडामोडी

आगीत घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला वडगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने मदतीचा हात

वडगाव मावळ येथील केशवनगर मधील घटना

वडगाव : येथील केशव नगर मधील घराला सोमवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. कुटुंब उघड्यावर पडले. या कुटुंबाला शहर राष्ट्रवादीने मदतीचा हात देत 31 हजारांची आर्थिक मदत केली आहे.

केशव नगर भागातील श्री हाइट्स बिल्डींग मध्ये गवंडीकाम करणाऱ्या अशोक शिंदे व फुले विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कल्पना शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता त्यांच्या पत्नीला रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी गेले होते. त्यांना सोडून घरी परत येत असताना घरातून धुराचा लोट बाहेर पडत असल्याचे त्यांनी पाहिले.  त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घरातील सिलेंडर बाहेर काढून शेजार्‍यांना आवाज दिला.

घटनेची पोलिसांना माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून “एक हात मदतीचा” या अंतर्गत वतीने वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या परिवारास कौटुंबिक परिस्थिती सांभाळता यावी यासाठी  रोख रक्कम ३१००० हजार शासकीय विश्रामगृह येथे मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके व तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी सुभाषराव जाधव, सचिन घोटकुले, राजेश बाफना, मयुर ढोरे, राजेंद्र कूडे, अतुल राऊत, पंढरीनाथ ढोरे, मंगेश खैरे, सुनील शिंदे, गणेश विनोदे, प्रकाश शिंदे, विशाल वहिले, आफताब सय्यद, सुरेश जांभूळकर, रोहिदास गराडे, भाऊसाहेब ढोरे, मयुर गुरव, गणेश ढोरे, प्रथमेश घाग, अनिकेत भगत, राहील तांबोळी व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने ही मदत देण्यात आली.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!