ताज्या घडामोडी
अश्विनी राजन शेळके यांना पीएचडी पदवी प्रदान
तळेगाव : येथील प्रा. अश्विनी राजन शेळके यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिक्षण शास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी उच्च प्राथमिक स्तरावरील हिंदी विषयासाठी ज्ञानरचनावादी अध्यापनाच्या परिणामकारकतेचा अभ्यास या विषयावर प्राचार्य डॉ उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांना प्रबंध सादर केला होता. या पीएचडी बद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.