ताज्या घडामोडी

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न होत आहे.दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधांनंतर संपन्न होणाऱ्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक व पूजाअर्चा सुरू झाली.त्यानंतर दिवसभर नागरिकांनी ग्रामदेवतेचे रांग लावून दर्शन घेतले. सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीचा हजारो बैलगाडा रसिकांनी आनंद घेतला. संध्याकाळी श्री नाथांचा छबिना पालखीची ग्राम प्रदक्षिणा भजनी मंडळाने ढोल लेझीम च्या तालात पार पडली.

दोन वर्षानंतर भरलेल्या या गाव जत्रेत अनेक दुकाने, खेळणी थाटण्यात आली होती. त्याचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला.यात्रा बंद असल्याने या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु या वर्षी व्यावसायिकांना आर्थिक चालना मिळाल्याने व्यापारी समाधान व्यक्त करत होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!