ताज्या घडामोडी

भोयरे शाळेतील आदर्श शिक्षक तानाजी शिंदे यांना ‘मावळरत्न’ पुरस्कार

मावळ : तालुका वारकरी सांप्रदायाच्या वतीने दिला जाणारा ‘मावळरत्न’ पुरस्कार मावळ तालुक्यातील भोयरे शाळेतील पदवीधर शिक्षक तानाजी शिंदे यांना प्राप्त झाला आहे.राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते विशाल लॉन्स,वडगांव मावळ येथे त्यांना गौरवण्यात आले.

तानाजी शिंदे यांचे मूळ गाव मावळ तालुक्यातील इंगळूण हे असून ते उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून सुपरिचित आहेत.सलग पाच वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत आहे.भजन स्पर्धेतही भोयरे शाळा नेहमी अव्वल क्रमांकावर राहिलेली आहे.

आतापर्यंत त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार,आंदर मावळ भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार,पंचायत समिती मावळचा आदर्श शिक्षक व क्रीडाशिक्षक पुरस्कार,शिवसेना पक्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समाज सहभागातून त्यांनी शाळेला सुमारे पंचवीस लक्ष रुपयांपर्यंतची मदत प्राप्त केली आहे.विद्याथ्यांच्या हितासाठी धडपडणारा शिक्षक म्हणून त्यांची आंदर मावळात ख्याती असून त्यांना ‘मावळरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!