ताज्या घडामोडी

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भांगरवाडीत महाप्रसादाचा कार्यक्रम

लोणावळा :  श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भांगरवाडीत आनंद महोत्सव सोहळ्याची होम हवन , महायज्ञ , लघुरूद्र आणि महाप्रसादाचा कार्यक्रमाने सांगता झाली.

ता.३१ रोजी ह.भ.प.चारूदत्त आफळे यांच्या नारदीय कीर्तनाने सुरू झालेल्या या आनंद सोहळ्यात ता.१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ अशी बीडचे बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांची कीर्तनसेवा झाली. या दिवशी सकाळी स्वामीभक्त सुंदराबाई कानगावकर यांना श्री स्वामी समर्थांनी अर्पण केलेल्या चर्मपादुका व आत्मलिंग पादुका आणि जक्कलमळा , सोलापूर येथील पेंटर श्री.काडलसकर यांचे वडील सद्गुरू शंकरमहाराज यांच्या पादुकांचे आगमन झाले. सकाळी ११ ते १२ पालखीची प्रदक्षीणा झाली. श्री स्वामी शंकर चिले सेवा भजनी मंडळाचे भजन झाले.ता.२ रोजी सकाळी श्रीक्षेञ पैजारवाडी , कोल्हापूर , येथुन प.पूज्य .सद्गुरू चिले महाराज यांच्या पादुकांचे आगमन झाले.तसेच दर्शन सोहळा झाला.

राञी सात ते नऊ रोजी सायंकाळी झी टाॕकीज फेम कीर्तनकार रोजी ह.भ.प.आर्जून महाराज खाडे ( आळंदी ) यांचे किर्तन झाले . तसेच ता.३ रोजी पहाटेपासूनच दुपारी दीडपर्यत सामुहिक अभिषेक , लघुरूद्र व स्वामियाग महायज्ञ झाला.सुमारे सव्वाशे जोडपी यात सहभागी झाली होती. यानंतर महाप्रसादाचा व दर्शनाचा हजारो भाविकांकडून लाभ घेण्यात आला. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवारातर्फे पार पडला. किर्तनाला साथसंगत नवमी भजनी मंडळांच्यावतीने करण्यात आली.कार्यक्रम कलावती आई मंदिरामागे , स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार येथे संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!