ताज्या घडामोडी

भैरवनाथ उत्सवानिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत रामदास शेलार यांच्या गाड्याने मारली बाजी 

लोणावळा : लोणावळा गावठाण येथे ग्रामदैवत श्री ढाक भैरवनाथ व श्री बाळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त टाटा भुशी तलावात आयोजित बैलगाडा शर्यतीत वरसोली येथील रामदास शेलार यांच्या बैलगाडीने वीस सेकंद ३९ पाॕईंटला गाडी आल्याने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक कुसगाववाडी येथील दिलीपशेठ उंबरकर यांच्या बैलगाडीने वीस सेकंद ५६ पाॕईंटला आणून मिळविला. तसेच तिसरा क्रमांक तुंगार्ली येथील गंगाराम मावकर यांनी वीस सेकंद ९९ पाॉईंट अशी वेळ नोंदवून पटकावला. चवथा क्रमांकाची बैलगाडी वेहेरगाव येथील सुरेश हुकाजी गायकवाड यांनी २१ सेकंद २४ पाॕईंटची वेळ नोंदवून मिळविला. तर मानाची बैलगाडी लोणावळ्याचे पोलिसपाटील प्रकाश हारपुडे व विजय हारपुडे (पाटील) यांच्या बैलगाडीने २५.सेकंद ४४ वेळ नोंदवून मानाची बैलगाडी हा किताब पटकावला.

यावेळी बक्षीस समारंभ श्री भैरवनाथ देवस्थान उत्सव समितीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे , खजिनदार खंडू कंधारे , उपाध्यक्ष नारायण वाळंज , सरचिटणीस प्रकाश तांबट , माजी नगराध्यक्ष अमित गवळी , पोलिस पाटील प्रकाश हारपुडे , कार्यकर्ते विजय हारपुडे , शुभम हारपुडे , पदाधिकारी सुमित गवळी , अमोल आण्णा ओंबळे , दिलीपशेठ मानकामे , दामुआण्णा चौव्हाण, राजु दळवी , तसेच गोपाळ हारपुडे , राजूशेठ तिकोणे , संजय हारपुडे ,अक्षय हारपुडे , प्रमोद हारपुडे , सुनिल हारपुडे , सुनिल ओंबळे , लक्ष्मण सावंत , निलेश हारपुडे , कमलेश हारपुडे आदी अनेक मान्यवर यांचे हस्ते बक्षिस समारंभ पार पडला.

प्रथम क्रमांक सुमित गवळी याँचेतर्फे ३१ रूपये , दुसरा क्रमांक सामाजिक कार्यकर्ते बाबुजी उर्फ नंदकुमार वाळंज २५ हजार , तिसरा क्रमांक माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी २० हजार रूपये , चवथा क्रमांक १५ हजार रोख कै.शंभो बबन हारपुडे स्मरणार्थ सुरज शंभो हारपुडे तर्फे ;तर पाचवा क्रमांक माजी नगरसेवक निखिल कविश्वर यांचेकडून १० हजार रोख बक्षिस ठेवले होते. घाटाचा राजा साठी सर्जा , महाद्या बैलजोडी स्मरणार्थ कु.दक्ष अक्षय हारपुडे यांजतर्फे ढाल व चषक देण्यात आली. तसेच कै.मनोहर पांडुरंग कदम स्मरणार्थ श्री.प्रविण मनोहर कदम तर्फे रोख देण्यात आले. या उत्सवामधे श्री भैरवनाथांचा भराडाचा कार्यक्रम झाला.बारामती येथील जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांचा कार्यक्रम झाला.तसेच श्री भैरवनाथ देवाच्या पालखी छबिण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!