तळेगाव दाभाडे: शहरातील संगीत रसिकांसाठी ‘गीतों का सफर’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदी व मराठी गीतांचा बहारदार ऑर्केस्ट्रा 'गीतों का सफर'
तळेगाव दाभाडे: शहरातील संगीत रसिकांसाठी ‘गीतों का सफर’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहेत.
हिंदी व मराठी गीतांचा बहारदार ऑर्केस्ट्रा ‘गीतों का सफर’ या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, मोहम्मद रफी फॅन क्लब, साक्षी डायग्नोस्टिक सेंटर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी लायन्स क्लब मैदान, तळेगाव दाभाडे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून कामगार दिनी वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक प्रथमच तळेगाव शहरात या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. कोरोना काळातील रसिकांची संगीताची भूक भागवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून घरातील लहानांपासून मोठ्यांना आवर्जून पहावा अशा कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी जास्तीत जास्त संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विलास काळोखे यांनी केले. आहे.