ताज्या घडामोडी

12D सिनेमॅटिका राईड चा अद्वितीय अनुभव आला” आयुक्त राजेश पाटील

पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार नगरी म्हणून नावारूपास आलेल्या शहरात अप्पुघर हे पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे जिल्हा तसेच राज्य, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजनाचे एक नावाजलेले केंद्र आहे. डॉ. राजेश मेहता.

12D सिनेमॅटिका राईड चा अद्वितीय अनुभव आला” आयुक्त राजेश पाटील
चिंचवड तारीख 11: निगडी येथील अप्पू घर मध्ये पर्यटकांसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 12D सिनेमॅटिक या राईड चे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यावेळी त्यांनी औपचारिकपणे ही प्रतिक्रिया दिली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता सतीश इंगळे तसेच नामांकित वकील अजित कुलकर्णी, अप्पू घर चे संचालक डॉक्टर राजेश मेहता, कार्यकारी संचालक कृष्णा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार नगरी म्हणून नावारूपास आलेल्या शहरात अप्पुघर हे पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे जिल्हा तसेच राज्य, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजनाचे एक नावाजलेले केंद्र आहे. डॉ. राजेश मेहता यांनी आजवर या अप्पुघर मध्ये सर्व वयोगटाचा विचार करून त्यांच्या करमणुकी संदर्भात प्राधान्यक्रम देत धडक गाडी, बलून राईड, मिनी ऑक्टोपस, भूत बंगला, जीरफ राईड, मेरी गो राऊंड, जम्पिंग फ्रॉग, अप्पू कोलंबस, अप्पू एक्सप्रेस, माय फेअर लेडी, गायडेड कार तसेच वॉटर पार्क पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या सर्व राईड ची आज आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी करून समाधान व्यक्त करून पर्यटकांच्या दृष्टीने अनमोल सूचना देखील केल्या.
आज 12 डी सिनेमाटीका या राईट असा प्रत्यक्ष अनुभव घेतला. डॉ. राजेश मेहता यांनी या राईटच्या वैशिष्ट्य सांगताना आयुक्त राजेश पाटील यांना म्हणाले या राईड मध्ये चित्तथरारक रोलर कॉस्टर, हेलिकॉप्टर, जंगल सफारी आधीचा प्रत्यक्ष बसल्या ठिकाणी आनंद उपभोगता येणार आहे परंतु यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची गरज नाही

यावेळी डॉ. राजेश मेहता यांनी, आयुक्त राजेश पाटील, सहभाग सहशहर अभियंता सतीश इंगळे आदी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!