ताज्या घडामोडी

वेहेरगावच्या डोँगरावर अवैध हातभठ्ठीवर ग्रामिण पोलिसांकडून कारवाई…….

वेहेरगाव भागात सुरू असलेल्या लोणावळा ग्रामिण पोलिसांनी अनेक कारवाया केल्या ;माञ नंतर पुन्हा या हातभट्ट्या सुरू केल्या जातात.

वेहेरगावच्या डोँगरावर अवैध हातभठ्ठीवर ग्रामिण पोलिसांकडून कारवाई…….
लोणावळा (प्रतिनिधी ) वेहेरगावच्या डोँगरावर अवैध हातभठ्ठीवर ग्रामिण पोलिसांकडून कारवाई करून तयार दारू व दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. या कारवाईत लोणावळा ग्रामिण पोलिस व ग्राम सुरक्षादल यांनी संयुक्तरित्या कारवाई केली.
वेहेरगाव भागात सुरू असलेल्या लोणावळा ग्रामिण पोलिसांनी अनेक कारवाया केल्या ;माञ नंतर पुन्हा या हातभट्ट्या सुरू केल्या जातात. आज पोलिस विभागाने डोंगरावरील हातभट्टीवर कारवाई करत हातोडा मारत ती नष्ट केली. ग्रामसुरक्षा दल, पोलिस मिञ व लोणावळा ग्रामिण पोलिसांच्या समन्वयातून गावठी हातभट्टीलाले दोन आरोपींना गजाआड केले.
विवेकानंद किशोर राठोड व त्याचा साथीदार यांचेवर छापा घालून कारवाई केली. त्यांचेकडून २३ लिटर गावठी दरू व २०० लिटर कच्चे रसायन जप्त करून नष्ठ करण्यात आले. लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसनिरिक्षक सचिन राऊळ , पोलिस हवालदार शकील शेख , शरद जाधवर व ग्राम सुरक्षादल व युवक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!