ताज्या घडामोडी

नूतन- पीसीईटी चा पीसीएसआयसी समवेत सामंज्यस करार

उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील अंतर दूर करून त्यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.

तळेगाव दाभाडे:नूतन- पीसीईटी चा पीसीएसआयसी समवेत सामंज्यस करार .    नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च आणि नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी यांचा पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्यूबेशन सेंटर (पीसीएसआयसी) यांच्या समवेत नुकताच सामंज्यस करार झाला. पीसीएसआयसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, पीसीएसआयसीचे संचालक नीलकंठ पोमण, व्यवस्थापक उदय देव, एनसीईआर च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, डॉ. विलास देवतारे, प्रा. एम. के. शेख, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे डॉ. ललितकुमार वधवा आदी या प्रसंगी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्यूबेशन सेंटर हे पिंपरी चिचंवड शहरातील स्टार्टअप तसेच उद्योजकांना तयार करण्याची महत्वाची भूमिका बजावत आहे. हे केंद्र वाय- फाय, विचारविनिमय कक्ष आणि इतर अनेक मूलभूत पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे नवोदित उष्मायनांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण बनले आहे.
या सामंज्यस कराराद्वारे एनसीईएआर तसेच एनएमआईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विविध तंत्रज्ञानामधील कौशल्य विकसनाचे काम करण्यात येणार आहे. उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील अंतर दूर करून त्यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. संस्थचे अध्यक्ष संजय ( बाळा ) भेगडे , उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के यांनी या कराराबाबत आनंद व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!