ताज्या घडामोडी

सोनचाफ्याच्या सहवासातली सुगंधी सकाळ…… रौप्य महोत्सवानिमित्त फ्रेंडस ऑफ नेचर ची अनोखी सहल…

एक चाफ्याचे झाड २० वर्षे फुले देते....थोडीशी काळजी घेऊन कमी मनुष्यबळात सुरु केलेला उपक्रम चांगला नफा देऊ शकतो.. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.अरुण काशीद

आवाज न्यूज: सोनचाफ्याच्या सहवासातली सुगंधी सकाळ……
रौप्य महोत्सवानिमित्त फ्रेंडस ऑफ नेचर ची अनोखी सहल.

तळेगाव दाभाडे: प्रबोधनातून निसर्ग संवर्धन या आपल्या घोष वाक्यानुसार फ्रेंड्स ऑफ नेचर या तळेगावच्या निसर्गप्रेमी संस्थेने आपल्या सभासदांसाठी एक अनोखी सहल आयोजित केली होती.अशी माहिती विश्वास देशपांडे यांनी दिली.
तळेगाव जवळच्या इंदुरीतील एका शेतकरी कुटुंबातील,अरुण काशीद यांच्या मुलांनी, तरुण पदवीधर इंजिनीअर बहिण भावांनी, अश्विन आणि केतकी यांनी सुरु केलेल्या चाफ्याच्या शेतीला भेट देण्यासाठी फ्रेंड ऑफ नेचरचे ३० निसर्ग प्रेमी इंदुरीला सकाळीच ६:३० वाजता गेले होते.
त्यांच्या अर्धा एकर जागेत लावलेल्या २०० चाफ्याच्या झाडापासून त्यांना रोज अदमासे १००० पेक्षा जास्त चाफ्याची सुंदर फुले मिळतात आणि ते सकाळी ८ च्या आता फुलांचे सुंदर पॅकींग करून ती मार्केट मध्ये रवाना होतात एक फुल २ रु.दराने विकले जाते..आपण सगळेच तरुण पिढीला नावे ठेवत असतो पण नौकरीची कास न धरता अशी अफलातून संकल्पना राबवून त्यापासून चांगला नफा मिळवणाऱ्या या बहिण भावडांच कौतुक करावं तेवढ थोडच आहे.
अरुण काशीद यांच्या सांगण्यानुसार एक चाफ्याचे झाड २० वर्षे फुले देते….थोडीशी काळजी घेऊन कमी मनुष्यबळात सुरु केलेला उपक्रम चांगला नफा देऊ शकतो.. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
फ्रेंड्स ऑफ नेचर चे माजी अध्यक्ष डॉ.गणेश सोरटे यांच्या संकल्पनेतून झालेली ही छोटीशी सहल खूपच छान आनंद आणि तरूण अभियंत्यांच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देऊन गेली आज योगायोगाने केतकीचा वाढदिवस होता तिला विविध अभिनेत्यांच्या आवाजाला शुभेच्छा देऊन फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक सदस्य सुनील गोडसे यांनी सहलीची मजा आणखीनच वाढविली.

२०२२ हे वर्ष फ्रेंड्स ऑफ नेचरचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे त्या निमित्त असेच विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष नीरज शाही यांनी सांगितले
या सहलीचे यशस्वी संयोजन फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष नीरज शाही, सुपर्णा गायकवाड, निशिकांत पंचवाघ,सुधाकर मोरे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!