ताज्या घडामोडी

निगडे शाळेतील पहिला दिवस, शाळेला शिष्यवृत्ती संच भेट,व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.

 निगडे शाळेतील पहिला दिवस, शाळेला शिष्यवृत्ती संच भेट,व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.

आवाज न्यूज निगडे मावळ: शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे याठिकाणी निगडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच,भिकाजी भागवत यांच्याकडून निगडे शाळेत,इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संच भेट देण्यात आले.

सरपंच सविताताई भांगरे यांनी मत व्यक्त करताना या विकासात सातत्याने विविध माध्यमातून, लोक सहभाग वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पालकमंत्र्यांच्या शाळा सुधार योजना, यामध्ये पाच शाळेची निवड झाल्याबद्दल, शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मा.उपसरपंच भिकाजी भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत आवश्यक ती मदत वेळोवेळी करणार असल्याचे सांगितले.

कोरोना काळानंतर पालकांनी आपल्या पाल्याबद्दल अधिक दक्ष राहून त्याच्या शैक्षणिक विकासात लक्ष देण्याचे आव्हान केले. गावचे उपसरपंच रामदास चव्हाण ,यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तर शिक्षण विभागाच्या,शेळके मॅडम यांनी शासकीय शिक्षण विभागाच्या ,शेळके मॅडम यांनी शासकीय योजनांची माहिती दिली, व उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.

शाळेच्या प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रभात फेरी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना खाऊ देऊन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सरपंच सविताताई भांगरे, उपसरपंच . रामदास चव्हाण, शाळा समिती अध्यक्ष, संतोष भांगरे, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या रुपाली शेळके मॅडम,ग्रामपंचायत सदस्य.भाऊ थरकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ शिंदे सर यांनी केले. मुख्याध्यापक शिवदे मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे नियोजन. मुंढे मॅडम व मखर मॅडम यांनी केले तर आभार भगत मॅडम यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!