ताज्या घडामोडी

आजच्या पिढीला व्यक्तिमत्व घडवणारे, शिक्षण देणे ही काळाची गरज – मा. आमदार, कृष्णराव भेगडे.

विद्यार्थ्यांना थोरामोठ्यांची चरित्रे शिकवणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांनी तळेगाव दाभाडे येथे सुरू केलेली शैक्षणिक चळवळ टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी.संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते

आजच्या पिढीला व्यक्तिमत्व घडवणारे, शिक्षण देणे ही काळाची गरज – कृष्णराव भेगडे
आवाज न्यूज – शिक्षणातून नवीन प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण व्हावेत, ही शासनाची अपेक्षा आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये विद्यालय व महाविद्यालयांच्या पातळीवर जवळपास 20 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्राकडे इतके दुर्लक्ष करून शासनाने संस्थाचालकांकडून गुणवत्ता शिक्षणाची अपेक्षा कशी करावी? असा सवाल मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केला. ते संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण संस्थेने आयोजित केलेल्या मावळ तालुक्यातील संस्थाचालकांच्या बैठकीत बोलत होते.                                                  मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते म्हणाले की, विद्यार्थ्यांना थोरामोठ्यांची चरित्रे शिकवणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांनी तळेगाव दाभाडे येथे सुरू केलेली शैक्षणिक चळवळ टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. या कामांमध्ये संस्थांनी मागे राहून चालणार नाही.                           या मेळाव्यासाठी मावळ तालुक्यातील 20 शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अप्पासाहेब बालवडकर, रामदास काकडे, यादवेंद्र खळदे, संतोष खांडगे, दीपक शहा, चंद्रकांत शेटे, संजय वाडेकर तसेच संस्थेचे सचिव शिवाजी घोगरे, शिक्षण संस्था महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस, सहसचिव महेश ढमढेरे, विलास पाटील, शांताराम पोमण, दत्तात्रय पाळेकर, नंदकुमार शेलार उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांनी केले. प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार शैलेश शहा यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!