ताज्या घडामोडी

पक्ष विरोधी काम करणाऱ्या,पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी.

राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, गणेश खांडगे यांच्याकडे केली

पक्ष विरोधी काम करणाऱ्या,पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी                                                        आवाज न्यूज:वडगाव मावळ दि. २० (प्रतिनिधी) पक्ष विरोधी काम करणाऱ्या पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, गणेश खांडगे यांच्याकडे केली असल्याचे पत्र सोमवारी (दि. २०) शासकीय विश्रामगृह दिले. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का ? अशी कुजबुज सुरू राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना दिलेल्या पत्रकात नमूद केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून “तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यात _ विकासाची घौडदौड व पक्ष संघटनेची झालेली मजबूत बाांधणी. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेले यशस्वी प्रयत्न . त्याचप्रमाणे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या माध्यमातून होत असलेला पक्ष संघटनेचा विस्तार, बांधणी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरणार आहे. तालुक्यात होत असलेला गतिमान विकास व बळकट होत असलेली संघटना यामध्ये बिघाड करण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे.

 

 

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी पक्ष सोडला, विरोधी पक्षात सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व पक्षाच्या उमेदवारावर टीका  केल्या.अशाप्रकारे पक्षविरोधी काम करणारे बाळासाहेब नेवाळे यांच्या (दि. ११जून) रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. काही पदाधिकारी, तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीचे इच्छुक हे निमंत्रण स्वीकारून त्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे त्या संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने बाळासाहेब नेवाळे यांना जिल्हा दूध संघावर तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संधी दिली, संपूर्ण पक्षच ताब्यात दिला, परंतु याचा गैरफायदा घेऊन नेवाळे यांनी स्वार्थी राजकारण केले, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांची उमेदवारी जाणीवपूर्वक तिकिटे कापली,  यामुळे पंचायत समितीची हातात येणारी सत्ता गेली. पक्षाने भरभरून दिले असताना सतत पक्षविरोधी काम

. करून पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडून दिला,  दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, आताही ते दुसऱ्या पक्षात आहेत. मग राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गरज का ? हा मोठा प्रश्न आहे. यावरून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यात सुरू असलेल्या प्रगतीमध्ये बिघाड, करण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे नेवाळे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीचे इच्छुक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!