ताज्या घडामोडी

मावळ, कुसूर गावातील जिल्हा परिषद ची शाळा आहे या शाळेत आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप!

मावळ, कुसूर गावातील जिल्हा परिषद ची शाळा आहे या शाळेत आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप  

आवाज न्यूज:मावळ कुसूर गावातील जिल्हा परिषद ची शाळा आहे या शाळेत आदिवासी व इतर गोरगरीब मुला मुलींसाठी शिक्षणासाठी   समाज कार्याची माहिती सोशल मिडियावर,  नेहमी सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करण्याचे कार्य पाहात असता असे सांगत दोन दिवसापूर्वी ,तानाजी काळभोर, यांना मावळ तालुक्यातील आंदर मावळातील दुर्गम भागातील ( वडेश्वर गावाजवळील) कुसूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक  उमेश माळी सरांनी फोन  केला असता कुसूर गावातील जिल्हा परिषद ची शाळा आहे या शाळेत आदिवासी व इतर गोरगरीब मुला मुलींसाठी शिक्षणासाठी वह्या व पेन ची आवश्कता आहे या मुलांच्या घरची परिस्तिथी फार गरीबीची आहे व आपण या मुलांना सहकार्य करावे अशी विनंती केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त  मित्र परिवार तर्फे सामाजिक उपक्रमातून,  समाज उपयोगी कार्यक्रम घेतला व संधी  उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथम  माळी सरांचे मनापासून आभार मानले.

माझ्या, मित्र परिवारास वरील अडचणी बाबत चर्चा उद्योजक विठ्ठलराव झोडगे, हिरामण गवई  ,भूपसिंग कलोडिआ साहेब, रामभाऊ दरोडे  ,इंद्रसिंग  राजपूत,सुधीर ढगे , किसन करदोरे या सर्व मित्रांना वरील विषय सांगितला व आपल्याला या सर्व मुलांना सहकार्य करायचे आहे असे सांगितले.

यावर हिरामण गवई  यांनी त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस साजरा न करता  कुसूर गावात जाऊन शाळेतील सर्व मुलांना वह्या व पेन वाटप करण्यात आले तसेच भूपसिंग कलोडिआ यांनी सर्व मुलांना मिठाई  वाटप  केली.    दि  .22/6/2022 रोजी दुपारी 4 वा.कुसूर गावातील जिल्हा परिषद च्या शाळेत जाऊन त्या सर्व मुला मुलींना चाररेघी,दुरेघी,एकरेघी,चौकटी च्या वह्या,पेन व खाऊ वाटप केला यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका .सुजाता भोसले मॅडम उमेश माळी सर,राजू वाडेकर सर इत्यादी उपस्थित होते या वेळी ,तानाजी काळभोर व विठ्ठलराव झोडगे यांनी या वेळी उपस्थित मुलांना शिक्षणाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापिका व सरांनी सर्वाचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व आभार मानले अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त कुसूरगाव व मोरमारीवाडी तील मुलांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती तानाजी काळभोर यांनी आवाज  न्यूज प्रतिनिधींना दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!