बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कामशेत पोलिसांची कारवाई.
बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कामशेत पोलिसांची कारवाई
आवाज न्यूज:कामशेत : बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगून गोळीबार करणाऱ्यांवर कामशेत पोलिसांनी शनिवारी (दि. २५) पहाटे कारवाई करत, या प्रकरणी रूपेश ज्ञानेश्वर वाघोले (वय ३०, रा . दारूब्रे), लहु अर्जुन काळे (वय ३४ रा . सांगुर्डी ता. खेड), अमोल ज्ञानेश्वर भेगडे (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे), गोपाळ ऊर्फ आप्पा धोंडीबा गायके (वय ४७, रा. कामशेत) यांना अटक त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत गावच्या हद्दीतील वडीवळे रेल्वेगेट जवळील रुचिरा हॉटेलच्या मोकळ्या जागेत दिनांक २२ ऑगष्ट २०२१ रोजी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद चे निवडणुकीचे अनुशंगाने रुपेश वाघवले, लहू अर्जुन काळे, अमोल ज्ञानेश्वर भेगडे, गोपाळ ऊर्फ आप्पा धोंडीबा गायके यांच्या मध्ये चर्चा चालु असाताना रुपेश वाघवले याने प्रभाव पाडण्यासाठी त्याचे कमरेला लावलेले बेकायदेशीर पिस्टल काढले व जोश मध्ये येऊन हातातील असलेल्या पिस्टलने हवेत फायर केला.
यासंदर्भात हॉटेल मालक, गोपाळ गायके यांनी हॉटेलवर प्रकार घडल्यानंतर फायरींग करणारी मुले, निघुन गेल्या नंतर हॉटेल मध्ये पडलेली बंदुकीच्या गोलीची पुंगळी टाकुन दिली, व घडलेला प्रकाराची पोलिसांना माहिती देणे आवश्यक असतानाही पोलिसांना माहिती न देता गंभीर गुन्हयाचा प्रकार लपवुन ठेवल्याने व पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक गायखे यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे करत आहेत.