ताज्या घडामोडी

मतदार याद्यांमध्ये राजकारण व हस्तक्षेप; भाजप आमदार खापरे यांचा आरोप…

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केल्याचा आरोप. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे

मतदार याद्यांमध्ये राजकारण व हस्तक्षेप; भाजप आमदार खापरे यांचा आरोप…

आवाज न्यूज पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात उघडपणे राजकीय हस्तक्षेप करण्यात येत असून, निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केल्याचा आरोप भाजपच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी केला आहे.

तसेच मतदारांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी आणि त्या दरम्यान मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी अशी मागणीही खापरे यांनी यावेळी केली आहे.

याबाबत नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनात म्हंटले की, राज्य निवडणूक आयोगाने पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून २०२२ रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर, प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलैला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. हरकती व सूचनांसाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तो अतिशय अपुरा असून, त्यात किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी. तसेच मतदार याद्यांबाबत संभ्रमावस्था असून, याद्यांची फाळणी करतांना प्रशासनाने प्रभागांच्या सीमांचा योग्य प्रकारे विचार करावा; असं न केल्याने, सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील मतदार याद्यांबाबत हरकती घेतल्या आहेत.

तसेच याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असून, नियमबाह्य कारभार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्तांकडून योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया खापरे यांनी यावेळी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!