ताज्या घडामोडी

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!!

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे, शनिवार दि. 2 जुलै 2022,. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज यावर्षी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक : चंद्रकांत काकडे , संस्थेचे अध्यक्ष   संदीप काकडे , संस्थेच्या खजिनदार, गौरी काकडे , शाळेच्या मुख्याध्यापिका, मीना अय्यर तसेच शाळेच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात शाळेतून प्रथम आलेली श्रेया ढोरे, द्वितीय अनुज भसे, तृतीय सौरभ पाटील व पार्थ काकडे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यात त्यांनी शाळेचे मिळालेले योगदान यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी घडवले असेही ते म्हणाले. संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष यांनी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप रमा बागुल यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!