ताज्या घडामोडी

मुसळधार पावसाने शाळेची भिंत कोसळली 

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..

कामशेत :-मुसळधार पावसाने शाळेची भिंत कोसळली 

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

आवाज न्यूज:  नाणे मावळतील उकसान गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीची एक भिंत मुसळधार पावसाने कोसळली. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी पासून या ठिकाणी नूतन इमारतीतील वर्ग खोल्यामध्ये शाळा सुरू आहे. या ठिकाणी असलेली जुनी शाळा धोकादायक असून ती त्वरित पाडावी अशी मागणी देखील शिक्षकांनी यापूर्वीच केली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या जुन्या वर्ग खोल्यांच्या भवताली विद्यार्थी खेळत असतात. दुपारी ३:३० च्या सुमारास ज्यावेळेस मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली त्यावेळेस विद्यार्थी वर्गामध्ये शिक्षण घेत होते.  सुदैवाने इमारती जवळ कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून शिक्षकांच्या मदतीला येत याठिकाणी असणारा राडारोडा उचलला.
मुख्याध्यापक राजू ढोरे की ज्या ठिकाणी भिंत कोसळली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास मनाई केली आहे.व मुलांना सुरक्षित ठिकाणी बसविण्यात आले. पुर्वी पासुन ही भिंत धोकादायक असल्याने मुलांना त्या वर्गात बसविण्यात आले होते त्यामुळे जिवीत हानी झाली नाही या शाळेचे नूतनीकरण करण्यात यावी त्यासाठी शासनाने त्वरित या ठिकाणी असलेली धोकादायक इमारत हटवावी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!