ताज्या घडामोडी

लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे;  रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी..

रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी औंढे , औंढोली , दुधिवरे , पवनानगर येथील वाहनचालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच ड्डे;  रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी..

आवाज न्यूज लोणावळा ता.८(प्रतिनिधी ) लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे ; रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी औंढे , औंढोली , दुधिवरे , पवनानगर येथील वाहनचालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
लोणावळा ते पवनानगर मार्गावर भैरवनाथनगर येथे अनेक खड्यांमुळे रिक्षाचालक , कारचालक , मोटारसायकलवार यांना कसरत करीत मार्ग काढावा लागतो.

या मार्गावर डोँगरगाव वाडी व औंढे या गावांच्या मधोमध द्रूतगतीमार्गावर असलेल्या पुलाखाली पाण्याचा निचरा न झाल्याने गुडघाभर पाणी साचलेले होते.. आज औंढे येथील ग्रामपंचायतीचे सदस्य रविंद्र मानकर यांचेकडून प्रयत्न करण्यात आला. यावेळी येथे काम चालू असलेल्या नवयोगा इंजिनियरींग कंपनीच्या अधिका-यांचे कानावर ही गोष्ठ घातल्यानंतर या कंपनीचे जी.एम. श्री आनिलकुमार यांनी हातचे काम सोडून जेसीबी लावून या पुलात साठणारे पाणी जेथे आडत होते व तुंबारा होऊन वाहनचालकांना रस्ता दिसत नव्हता. तो रस्ता जेसीबी लावून मोरीतील चिखल , दगडगोटे काढून पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग काढला.तसेच रस्त्यावर साचलेला चिखल व राडारोडा काढून मार्ग सुरळीत केला. यावेळी अधिकारी श्री .मल्लेशजी यांचेतर्फे विशेष परिश्रम घेतल्यानंतर रस्ता तासाभरात मोकळा झाला..

या कृतीबद्दल त्यांचेमुळे मार्ग मोकळा झाल्याबद्दल ग्ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले..
दरम्यान दुधिवरेखिंड येथे लहानथोर दगडगोटे दरड स्वरूपाचे खाली रस्त्यावर आले होते.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. येथे स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर आलेले दगडगोटे बाजूला काढून मार्ग मोकळा केला…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!