ताज्या घडामोडी

मुस्लिम बांधवांनी आपापसात भाईचारा ठेवावा ः मौलाना मोहसीन सय्यद, बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा..

पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईद आज पावसाच्या वातावरणात ईदगाह मैदानाऐवजी मजिद, मदरसेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

मुस्लिम बांधवांनी आपापसात भाईचारा ठेवावा ः मौलाना मोहसीन सय्यद, बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा..

आवाज न्यूज: चिंचवड ११  बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद व आषाढी एकादशीनिमित्त एकमेकांना मोबाईलद्वारे, मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. गेली 2 वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे मुस्लिम बांधव ईद घरीच साजरी करत होते.

पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईद आज पावसाच्या वातावरणात ईदगाह मैदानाऐवजी मजिद, मदरसेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. काही इदगाह मैदानावर देखील ईदची नमाज पढविण्यात आली. भल्या सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद व मदरसाकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना नमाज सकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ज्यांनी कुरबानी केली होती. त्यांनी आसपास, मोहल्ल्यात तसेच, शहरातील परिचितांना व मुस्लिम बांधवांना एकूण कुरबानीचे मटणाचे तीन हिस्से वाटून बकरी ईद साजरी केली.

चिंचवड स्टेशन येथील दवा बाझार येथील समा ए दिन ए आदब मजीदमध्ये मौलाना मोहसीन सय्यद यांनी नमाज पठणाआधी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, तुम्ही या बकरी ईद सणानिमित्त जसे मोठ्या संख्येने नमाज पठणासाठी उपस्थित आहात. अनेकजण शुक्रवारची नमाज पठण करतात. तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावी. तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत. त्याची क्षमा अल्लाह जवळ मागा, सत्याची कास अंगिकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडीलांनी करावे, मोहल्यातील उपेक्षित बांधव उपाशी राहताकामा नये, मुस्लिम बांधवांनी एकोपाने राहून एकमेकांच्या सुखःदुखात सामिल होत समाज एकोपाचे दर्शन घडवावे, कौटुंबिक कलह असतील तर ते दुर करून आजपासून एकत्र यावे, यावेळी बकरी ईद सणाची माहिती विषद केली.
अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार, जाकीर मेमन, राजमहम्मद अत्तार, फिरोज पठाण, मोहसीन मुल्ला, जहीर सय्यद, आशरफ जमादार आदी उपस्थित होते. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
निगडी येथील नुरानी मजीदमध्ये मौल्लाना शाहीद सलाम रेहमान व हाफिज जहुर अहमद यांनी नमाज पढविला. तेथे रशिद शेख, लियाकत शेख, मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले. आकुर्डीत मदिना मजीद, अक्सा मजीद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातीमा मजीद, नुरूल इस्लाम मजीद, कस्तूरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मजीदमध्ये नमाज पढविण्यात आला.
चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मजीदमध्ये मौल्लाना फैज अहमद फैज यांनी नमाज पढविला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!