ताज्या घडामोडी

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

आवाज न्यूज: चिंचवड १५ : कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी केली.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून विविध गुण दर्शनाच्या सादरीकरणातून गुरुवंदना केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य सादर करून शिक्षकांचे मनोरंजन केले. तसेच; कविता सादरीकरण व भाषणे या माध्यमातून गुरुमहत्त्व सांगितले. यामध्ये बी. एडव कनिष्ठ महाविद्यार्थी सहभागी होते.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक

केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ वेचलेकर व प्रज्ञा कापसे या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन हर्षा गवळी या विद्यार्थिनीने केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!