ताज्या घडामोडी

इंदूरहून पुण्याला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू..

मुख्यमंत्री सचिवालय देखील बचाव कार्यात खरगोन, धार आणि इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान...

इंदूरहून पुण्याला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

आवाजन्यूज : १८   इंदुरहून पुणेकडे येणारी एसटी बस धामणोदच्या खलघाट येथे पुलावरुन थेट नर्मदा नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू जाला आहे तर १५ जणांना नदीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे दुर्घटनेसंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “मी खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा फोनवर चर्चा केली आणि बचाव कार्याबाबत सविस्तर माहिती घेतली. मुख्यमंत्री सचिवालय देखील बचाव कार्यात खरगोन, धार आणि इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, अपघातात बळी पडलेली बस महाराष्ट्र सरकारची होती. इंदूरहून १२ प्रवासी बसमध्ये चढले होते. बसमध्ये ५०-५५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. मात्र, नदीतून आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला की स्टेअरिंग बिघडल्याने, हा तपासाचा विषय आहे. पुलाचे रेलिंग तोडून बस नदीत पडली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहेत.

धार जिल्ह्यात असलेला खलघाट पूल बराच जुना असल्याचे सांगण्यात येते. तेथून प्रवासी बस नर्मदा नदीत पडली. नदीचा प्रवाह जास्त असल्याने मदत आणि बचावकार्यात अडचणी येत आहेत. बसमधील २० ते २५ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा बचाव पथक शोध घेत आहे. नदीतून बाहेर काढलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी धार रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बस पुलावरुन कोसळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांना सर्वप्रथम बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि अन्य प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!