ताज्या घडामोडी

गणेश बोत्रे युवा मंचने बुजविले चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे, नागरिकांनी केले कौतुक..

आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोत्रे युवा मंचच्या वतीने मुरूम टाकून जेसीबी व रोड रोलरच्या साहाय्याने बुजविले खड्डे ।।

गणेश बोत्रे युवा मंचने बुजविले चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे, नागरिकांनी केले कौतुक

आवाज न्यूज : चाकण, प्रतिनिधी २० जुलै ||

चाकण एमआयडीसी,मागील आठवडाभर झालेल्या संततधार पावसामुळे चाकण-तळेगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. हे खड्डे, सामाजिक भान ठेवून आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोत्रे युवा मंचच्या वतीने मुरूम टाकून जेसीबी व रोड रोलरच्या साहाय्याने खड्डे बुजविण्यात आले.

चाकण- तळेगाव रस्त्यावर खालूंब्रे गावच्या हद्दीत ह्युंडाईकडे जाणाऱ्या चौकात, कला जनसेट कंपनी समोर, महाळुंगे गावात कमानी समोर, ब्लॅक अँड डेकर कंपनीसमोर, सारा सिटी कमानी समोर व युनिकेअर हॉस्पिटलपासून तळेगाव चौकापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालून वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. पाऊस थांबल्यानंतर युवा मंचच्या वतीने हे खड्डे त्वरित बुजविण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!