ताज्या घडामोडी

महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांचा शपथविधी आश्रमशाळा कामशेत येथेमोठ्या उत्साहात संपन्न..

महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या शपथविधी निमित्त महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांचा शपथविधी आश्रमशाळा कामशेत येथेमोठ्या उत्साहात संपन्न..

आवाज न्यूज प्रतिनिधी शिवानंद कांबळे कामशेत २५ जुलै

महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या शपथविधी निमित्त महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमानिमित्त आश्रम शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना राष्ट्रपती महाराष्ट्र भवनातील महामहीम राष्ट्रपती द्रौपदीची मुर्मू यांचा लाईव्ह शपथविधी कार्यक्रम एलसीडी प्रोजेक्टवर दाखवण्यात आला. सदर कार्यक्रमानंतर महर्षी कर्वे आश्रम शाळा ते कामशेत बाजारपेठ शिवाजी चौकापर्यंत आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे ढोल, ताशा पथक सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी चौक येथे ग्रुप ग्रामपंचायत कामशेत येथील सरपंच, उपसरपंच, विद्यमान सदस्य, आजी माजी सदस्य आणि नागरिक, कामशेत शहर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी ग्रामस्थ, पालक यांच्या उपस्थितीमध्ये महामहीम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. व त्याच ठिकाणी आमच्या आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून आपला आनंदोत्सव साजरा केला.

यानिमित्त आश्रमशाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी विद्या विठ्ठल बगाड व अश्विनी रोहिदास पारधी यांनी महामहीम राष्ट्रपती यांचा जीवनपट सर्व ग्रामस्थांना कथन केला व आश्रम शाळेतील ऋतुजा अनंता कशाळे इयत्ता दहावी या विद्यार्थिनीने स्वरचित कविता सादर केली. त्याच ठिकाणी फुलांची उधळण तसेच फटाके आतषबाजी करून सर्वांना साखर वाटून मोठ्या उत्साहात महामहीम राष्ट्रपती यांच्या शपथविधी निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतरकर्मचारी ,ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांचे कौतुक करून कामशेत येथील व्यापारी श्री अमरा राम चौधरी यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमास शाळा समितीचे सदस्य श्री विक्रम शेठ बाफना हे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!