ताज्या घडामोडी

कामशेत, वीज बील वेळेवर न मिळाल्याने वीज धारकांना आर्थिक भुर्दंड.

महावितरणच्या कार्यालयातून वीज बील वाटप वेळेवर  होत नाही आणि जरी वाटप केले तरी ते वीज बील भरण्याची अंतिम तारीख संपल्या नंतर वीज बील वाटले जाते हे दर महिन्याला होत असते त्यामुळे  नाहक अतिरिक्त रक्कम भरावी लागते यांस जबाबदार कोण?

कामशेत वीज बील वेळेवर न मिळाल्याने वीज धारकांना आर्थिक भुर्दंड.

आवाज न्यूज:कामशेत प्रतिनिधी शिवानंद कांबळे

कामशेत येथील महावितरणच्या गलथानपणा मुळे वीज धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.कारण कामशेत येथील महावितरणच्या कार्यालयातून वीज बील वाटप वेळेवर  होत नाही आणि जरी वाटप केले तरी ते वीज बील भरण्याची अंतिम तारीख संपल्या नंतर वीज बील वाटले जाते हे दर महिन्याला होत असते त्यामुळे  नाहक अतिरिक्त रक्कम भरावी लागते यांस जबाबदार कोण? शिवाय वीज बील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येते ते वीज बील भरणे अवघड असते, कारण महिना अखेर असल्याने बील भरणे अशक्य असते .

जर वीज बील वेळेत भरले नाही तर वीज कनेक्शन तोडण्यास महावितरण चे कर्मचारी येतात व प्रसंगी वीज कनेक्शन तोडतात यांचा मानसिक  त्रास ग्राहकाला सहन करावा लागतो.
यासंबंधी कामशेत चे  कार्यकारी अभियंता महाजन साहेब यांना फोन केला असता फोन ते उचलत नाहीत.
तालुका कार्यकारी अभियंता सुर्यवंशी यांना फोन केला असता त्यांनी सांगितले मागील महिन्यात पावसामुळे प्राॅब्लेम झाला होता, त्यामुळे बिले वाटले नाही येथून पुढे बिल वेळेत वाटले जाईल असे त्यांनी सांगितले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!