लोणावळा एस टी बसस्थानकात बसच्या फे-या वाढल्यामुळे प्रवाशी , फेरीवाले , हाॕटेलवाले यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण …
आवाजन्यूज ने या बाबत आढावा घेऊन मनसे शहराध्यक्ष आणि फेरीवाले , हाॕटेलवाले , दुकानदारांना , प्रवाशी यांचे म्हणणे ऐकून घेत , समस्यांचे वृत्त प्रसारित केल्याच्या दुसऱ्या दिवशी परिणामकारक बदल झाला..
लोणावळा एस टी बसस्थानकात बसच्या फे-या वाढल्यामुळे प्रवाशी , फेरीवाले , हाॕटेलवाले यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण …
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२५ प्रतिनिधी
राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने लोणावळा शहरात असलेले अधिकृत बसस्थानकात बसच्या फे-या वाढविल्याने येथे मुंबई , पुणे , ठाणे , पनवेल , बोरिवली , तसेच राज्यातील विविध शहरात जा ये करणाऱ्यांची होणारी गैरसोय , हाॕटेलवाले , फेरीवाले , दुकानदारांना होणारा ञास लक्षात घेवूच लोणावळा बसस्थानकात बससेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांमधे आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
वलवण ला आनधिकृत थांब्यावर बस थांबत होत्या , तेथून प्रवाशांना रिक्षाला जादा पैसे मोजून लोणावळ्याचे रेल्वेस्टेशनला , बाजारपेठेत , बसस्थानकात यावे लागत असे.
आवाजन्यूज ने या बाबत आढावा घेऊन मनसे शहराध्यक्ष आणि फेरीवाले , हाॕटेलवाले , दुकानदारांना , प्रवाशी यांचे म्हणणे ऐकून घेत , समस्यांचे वृत्त प्रसारित केल्याच्या दुसऱ्या दिवशी परिणामकारक बदल झाला.. येथून असंख्य बसेसची जा ये चालू झाली.
कोरोनाच्या लाॕकडाऊन मधे व एसटीचे कर्मचारी यांचे पाच सहा महिने संपामुळे अर्थव्यवस्था ढासळून गेलेल्या या एसटी बसस्थानकामधून आता पंधरा मिनिटांनी एक बस सुटत आसून येथे वाहतूक नियंत्रक , अधिकारी , कर्मचारी यांचे कार्यक्षम कामामुळे प्रवाशांना गाड्यांना जाताना येताना विलंब होत नाही.