ताज्या घडामोडी

कै.शुभम बालगुडे याचे प्रथम पुण्यस्मरणानिमित गौळीवाडा श्रीराममंदिरात रक्तदान शिबीर संपन्न..

१३० बाटल्या रक्त संकलन...

कै.शुभम बालगुडे याचे प्रथम पुण्यस्मरणानिमित गौळीवाडा श्रीराममंदिरात रक्तदान शिबीर संपन्न ;१३० बाटल्या रक्त संकलन.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१५ (प्रतिनिधी )

कै.शुभम सुखदेव बालगुडे याचे अपघाती मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याने कै.शुभम सुखदेव बालगुडे याचे प्रथम पुण्यस्मरणानिमित गौळीवाडा श्रीराममंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीर सर्व तरूणांचे विशेष सहयोगाने संपन्न झाले.

या वेळी श्री शिव शंभू चॕरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आयोजित या शिबीरात सुमारे १३० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. ट्रस्टचे सर्व डाॕक्टर व परिचारिका यावेळी उपस्थित होत्या. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपञे प्रदान करण्यात आली.

गौळीवाडा येथे श्रीराम मंदिरात झालेल्या शिबीराचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुधिर शिर्के , माजी नगरसेवक दिलीप तथा भिकुदादा लोंढे , माजी नगरसेवक नितीनशेठ आगरवाल , युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेवक निखिल कविश्वर , उद्योजक मंगेश बालगुडे , सामाजिक कार्यकर्ते मनोज मोगरे , माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी आणि अनिल उन्हाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी सूर्यकांत औरंगे , दर्शन लोंढे , सुनिल कारंडे , विजय गायकवाड , मुकूल बिडकर , यतीन आकोलकर , कौशिक मोगरे , अविनाश औरंगे , आर्जून गवळी , परेश घरदाळे , अमोल चौधरी , संजय गवळी , भावेश मासबामणी , सनी शिर्के , वशीम शेख आदींनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

कै.शुभम बालगुडे मिञ परिवार व कँटीन बाॕईज यांचेकडून या शिबीराचे आयोजन श्रीराममंदिरात केले होते. सकाळी नऊ ते सायंकाळी साडे चार असे शिबीर झाले. .यावेळी १३० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन शिबीर यशस्वी केले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!