ताज्या घडामोडी

पुसाणे , मावळ येथील आठ घरांना आग लागून भस्मसात झाली होती..

आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना.    तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला मदतीचा हात..

पुसाणे , मावळ येथील आठ घरांना आग लागून भस्मसात झाली होती..

आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना.    तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला मदतीचा हात..

आवाज न्यूज :  पुसाणे . मावळ, १५ नोव्हेंबर.

मावळ येथील पुसाणे गावात शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीमध्ये सात ते आठ घरे भस्मसात झाली होती. घरामधील जीवनावश्यक वस्तूंचे या आगीमध्ये नुकसान झाले. त्यांना तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी मदतीचा हात दिला.

एकमेकांना लागून असलेली इतर घरे गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. आगीची घटना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची अग्निशमन दलाची एक गाड़ी तत्काळ घटनास्थळी पाठवून दिली. जळीतग्रस्त कुटुंबाची घटनास्थळी भेट घेऊन त्या कुटुंबांना आर्थिक मदत केली. त्यासोबतच पीडित कुटुंबांना शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न केले.

प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे, मंडल अधिकारी संगीता शेरकर, तलाठी राहुल गायकवाड, सोमनाथ कालेकर यांनी उपस्थित राहून पंचनामा केला. पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आवारे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, कल्पेश भगत, सरपंच. संजय आवंढे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!