इंद्रायणी महाविद्यालयास खोखोमध्ये उपविजेतेपद…
इंद्रायणी महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन खोखो (मुली) स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले आहे.
इंद्रायणी महाविद्यालयास खोखोमध्ये उपविजेतेपद.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २३ नोव्हेंबर :
इंद्रायणी महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन खोखो (मुली) स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व साहेबराव काकडे महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.
महाविद्यालयाची प्रियंका इंगळे,रुतिका राठोड, साक्षी शेंडगे, सोनी साहू यांनी अष्टपैलू खेळी केली. प्रियांका इंगळे व रुतिका राठोड या दोघींची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुरेश थरकुडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त मंडळ, तसेच प्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.