ताज्या घडामोडी

गोवा राज्य निर्मीत विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..

सुमारे ८७ लाख ८९ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त...

गोवा राज्य निर्मीत विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई,

सुमारे ८७ लाख ८९ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी,२३ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे : गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. २३) कारवाई करत सुमारे ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच मध्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण १ कोटी ५ लाख ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभागाच्या पथका मार्फत बुधवारी (दि.२३) तळेगाव दाभाडे शहराच्या हददीत, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा लावुन गोवा राज्य निर्मीती व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेवुन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली. या ट्रकची (क्र.एम एच ४६ एएफ – ६१३८) तपासणी केली असता त्यामध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १ हजार २६७ बॉक्स मिळुन आले.

या कारवाईत ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीचा मद्य साठा व बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनसह १,कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४ वर्षे, रा.मु.पो. तांबोळे ता. मोहोळ जि. सोलापूर), देविदास विकास भोसले (वय-२९ वर्षे रा. मु.पो खवणी ता.मोहोळ जि.सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक. दिपक बा. सुपे, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे, योगेंद्र लोळे, महेश लेंडे, स्वाती भरणे, सहा. दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, रवि लोखंडे व जवान भागवत राठोड, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, तात्या शिंदे, दत्ता पिलावरे, शिवाजी गळवे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिपक सुपे हे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!