ताज्या घडामोडी

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ..

आयएमए तळेगाव शाखेच्या मासिक सभेला संबोधित करताना--" सांगेन गोष्टी चार युक्तीच्या"-- हा विषय घेऊन  सर्वांशी, डॉक्टर शाळीग्राम भंडारी, यांनी संवाद साधला!

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २५ नोव्हेंबर.

आयएमए तळेगाव शाखेच्या मासिक सभेला संबोधित करताना–” सांगेन गोष्टी चार युक्तीच्या”– हा विषय घेऊन  सर्वांशी संवाद साधला! या स्पर्धेच्या युगात आपली जीवनशैली खरोखरच विचार करण्या इतपत बदललेली आहे! आज माणूस अंतराळात पोहोचला आहे पण अंतकरणापासून खूपच लांब गेला आहे हे कटू सत्य आहे! संवाद आणि मनोरंजनाच माध्यम बदललेले आहे! रेल्वेस्टेशन -एसटी स्टँड सारख्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक जण मोबाईल मध्ये गुंतला आहे! पण– शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलणे तर लांबच राहिले पण बघायला सुद्धा त्याला वेळ नाही!

आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी त्याची आवश्यक असलेली धडपड त्याला व्यवसाया व्यतिरिक्त इतरांशी संवाद साधण्यासाठी वेळ देऊ शकत नाही आणि इथेच त्याच्या अस्वस्थतेच उत्तर मिळतं! पन्नास वर्षांपूर्वी त्याच्याकडे भरपूर वेळ होता पण आजच्या इतकी साधन नव्हती- सुबत्ता नव्हती पण त्याच्याजवळ संवाद मात्र होता! आणि मित्रांनो हा संवाद आत्मिक समाधान आणि शांततेसाठी प्रत्येकाला अत्यंत आवश्यक आहे! कारण तो आपल्या मनातील साचलेल्या सर्व विचारांचा निचरा करण्यास अत्यंत आवश्यक असलेला असा आउटलेट आहे! आज कुठलीही व्यक्ती दोन वर्तुळात जगते! एक वर्तुळ त्याच्या कुटुंबाचं दुसरं त्याच्या व्यवसायाच! त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटनांचे परिणाम दोघई वर्तुळांना अलटून पालटून भोगावे लागतात! यामुळे बऱ्याच वेळा त्याला नैराश्य आणि ताण- तणावाला त्याची इच्छा असो वा नसो त्याला समोर जावंच लागतं! यातून त्याची सुटका जर करायची असेल तर फक्त आणि फक्त एखादी सामाजिक संस्थांच त्याची ती सुटका करू शकते!

कारण कोणत्याही सामाजिक संस्थेच्या सभासत्वामुळे त्याच्यासाठी तिसरं वर्तुळ आपोआप तयार होतं! मित्रांनो या वर्तुळात तो आपल्या आयुष्यातील भावभावनांचे विविध अविष्कार प्रगट करू शकतो! मला वाटतं हेच तत्व प्रत्येक व्यवसायाला लागू पडतं! म्हणून सांगेन गोष्टी चार व्यक्तीच्या- यात भाकरी नोकरी छोकरी व्यतिरिक्त सामाजिक दायित्व म्हणून तो आपलं योगदान” टाईम- टॅलेंट आणि ट्रेझर”– या तीन पैकी कोणत्याही किंवा एकत्रित रूपात तो सहज देऊ शकतो! शेवटी राष्ट्रभाषेत हेच सांगता येईल की– सब बिमारी की एकही दवा– यही है!यही है!

डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!