ताज्या घडामोडी

मृत्यू– एक सुंदर सत्य..डॉ शाळीग्राम भंडारी…

मृत्यू हा रुद्रभीषण असूनही मी मृत्यूला सुंदर सत्य म्हणतोय याचं कारणही असंच आहे की -एका मावळतीत उद्याच्या उगवतीचा संदेश आहे!-एका सूर्यास्तात उद्याच्या सूर्योदयाचा सिद्धांत आहे!

मृत्यू– एक सुंदर सत्य!–

आवाज न्यूज ; विशेष लेख, डॉ शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे, २७ नोव्हेंबर.

नटसम्राट “विक्रमजी गोखले” यांनी आपला इहलोकीचा शेवटचा श्वास घेतला! माझा वैद्यकीय व्यवसाय असल्याने आम्ही अनेक मृत्यू अतिशय जवळून बघतो! रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या विक्रम गोखले सरांच्या निधनाची बातमी कळल्यावर मी मृत्यूकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं! मग माझ्या लक्षात असं आलं की- या जगात मृत्यू इतकं सुंदर सत्य दुसरं कुठलंच नाही!

मृत्यू हा रुद्रभीषण असूनही मी मृत्यूला सुंदर सत्य म्हणतोय याचं कारणही असंच आहे की -एका मावळतीत उद्याच्या उगवतीचा संदेश आहे!-एका सूर्यास्तात उद्याच्या सूर्योदयाचा सिद्धांत आहे! मृत्यू प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने येतो! आपल्याही नकळत कधी हळुवार पावलांनी झडप घालतो- तर कधी अचानक दणकट मिठी मारतो!कधी कधी वाट पाहायला लावतो! तर कधी फक्त दर्शन घडवतो आणि आपला पाश काढून घेतो!

मृत्यू कसाही असला तरी- आपली- इच्छा असो वा नसो- त्याला सामोर जावंच लागतं! म्हणून मृत्यूचंभय वाटण्यापेक्षा त्याचं स्वागत करणं हेच जास्त आनंददायी ठरत!  पार्थिवाकडून अपार्थिवाकडे जाणं म्हणजे मृत्यूच्या पालखीत बसण! काळोखाचे दूत ही पालखी आपल्या खांद्यावर घेऊन काळोखात आपली वाटचाल करतात! अज्ञात रस्ता! अंतर माहित नाही! जगणं जगविणं या दोन शब्दात बद्ध असलेल्या आपल्या पाप पुण्याचा हिशोब संपला की या दूतांबरोबर आपल्याला जाणं क्रमप्राप्त ठरतं! नवीन पहाट सुरू होते! मंदवारा वाहू लागतो! पूर्वा उजळू लागते! पक्षांना जाग येते! त्यांची किलबिल सुरू होते!-

कुठेतरी प्रसववेदना संपतात आणि मृत्यूच्या पालखीतला तो आत्मा एका नव्या गर्भात प्रवेशतो! ही एक मृत्यूनंतर आसमंत उजळणारी एक नवीन पहाट असते! शेवटी मित्रांनो- स्वतःलाच मी विचारतो की- मृत्यू खरोखर असाच असतो का? होय मित्रांनो- असाच असतो! निश्चितच – जाणिवेच्या अनुभूतीतून उमगणारा- असा आणि असाच असतो!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!