संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त पांडुरंगाची महापूजा तळेगाव दाभाडे शहरातील विठ्ठल मंदिरात संपन्न.
विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त महेंद्र विश्वनाथ कसाबी या परिवाराच्या वतीने पांडुरंगाची महापूजा करण्यात आली.
अध्यात्मिक : संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त पांडुरंगाची महापूजा संपन्न.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २१ डिसेंबर.
जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळेगाव दाभाडे शहरातील विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त समाज बांधवांच्या उपस्थित महेंद्र विश्वनाथ कसाबी या परिवाराच्या वतीने पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली.
त्यानंतर श्री संत शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे. किरणजी गवारे. सोनबा गोपाळे गुरुजी. प्रकाशराव वालझाडे. संजयशेठ कसाबी.
तळेगाव शहर तेली समाजाचे सचिव शैलेशजी मखामले. संताजी प्रतिष्ठान चे सचिव तुषारशेठ जगनाडे. प्रदीपशेठ टेकवडे. अनिल जगनाडे. सुधाकर बारमुख. अभिजितशेठ कसाबी. खळदे काका. विठ्ठलराव खोंड समाज बांधव व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते