ताज्या घडामोडी

शरीर पाण्याने -मन ज्ञानाने आणि आत्मा धर्माने स्वच्छ होतो.

ज्याप्रमाणे आपली वास्तु आणि परिसर आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणेच आपल्या मनाच्या स्वच्छतेची काळजी आपल्याला घेणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला मानसिक सुख-शांती प्राप्त होऊ शकणार नाही.

शरीर पाण्याने -मन ज्ञानाने आणि आत्मा धर्माने स्वच्छ होतो.

आवाज न्यूज : मावळ वार्ताहर विशेष लेख. १५ फेब्रुवारी.

 ज्याप्रमाणे आपली वास्तु आणि परिसर आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणेच आपल्या मनाच्या स्वच्छतेची काळजी आपल्याला घेणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला मानसिक सुख-शांती प्राप्त होऊ शकणार नाही.

म्हणूनच आपल्या मनाचा रिमोट आपल्या हाती असणं आवश्यक आहे. जसं मित्रांनो टीव्ही पाहत असताना त्याचा रिमोट आपण नेहमी स्वतःच्या हातात ठेवू इच्छितो तसच आपल्या भावनांचा रिमोट ही आपल्या स्वतःच्या हाती असणे आवश्यक आहे त्याची आवश्यकता का आहे हे एक उदाहरण घेऊन बघू या आपला एक जवळचा मित्र दुःखाने होरपळलेला आहे अशा स्थितीत जर तुम्ही त्याला मानसिक आधार देण्याचे सोडून त्याच्याच बरोबर भावनेच्या आहारी जाऊन दुःखी झालात तर ती व्यक्ती आपल्या बुद्धीचा आणि मनाचा योग्य उपयोग कसा करू शकेल म्हणून,भावनिक व्यवस्थापन म्हणजेच इमोशनल मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे.

जसे दैनंदिन जीवनात आपण बाहेर कितीही कार्यमग्न असलो तरीही मधून मधून थोडा वेळ काढून फोनवर आपल्या मुलांचं आणि पर्यायाने कुटुंबाच काय चाललेलं आहे याची माहिती घेत असतो त्यांना विचारत असतो तुम्ही जेवलात का तुम्हाला दिलेले काम तुम्ही केलं का वगैरे वगैरे त्यांची सारखी चौकशी करीत असतो काही वर्षानंतर असा अनुभव येतो की “ज्यांनी ही घरी कधीच चौकशी केली नाही त्यांच्या घरची मुलं बेशिस्त आणि बेजबाबदार झालेली दिसतात” अगदी तसच मित्रांनो आपल्या मनाचं असंच असतं मुलांप्रमाणेच मध्ये मध्ये थोडं थांबून जर आपण मनाची स्थिती जाणून घेतली तर, आपल्या मनामध्ये आता नक्की काय चालू आहे हे आपल्याला कळेल आणि मनाचा रिमोट निश्चितच आपल्या हाती असेल आणि तोच आपल्याला इमोशनल मॅनेजमेंट साठी म्हणजेच भावनिक व्यवस्थापनासाठी निश्चितपणे उपयोगी पडू शकेल.

 कारण रिकाम मन हे सैतानाचं घर असत मित्रांनो कल्पना करा की, आपल्याजवळील तीन एकर जमिनीत दोन एकर मध्ये आपण पिकाची पेरणी केली आणि एक एकर शेती तशीच रिकामी ठेवली तर त्यात निश्चितपणे नको असलेलं गवतं आणि जंगली काटेरी वनस्पती उगवल्या शिवाय राहणार नाही.म्हणून मनाला नेहमी कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवून ठेवण आवश्यक आहे ही मनाची रिमोटची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ज्यांना आणणे जमले त्यांना मनशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!