ताज्या घडामोडी
घरगुती गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलेंडर 25 रुपयांनी महागला आहे. मागील साडेआठ महिन्यात गॅसच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ झाली आहे.
सोमवारी रात्री ही दरवाढ लागू झाली. त्यानुसार मुंबई आणि दिल्लीमध्ये 859.50 रुपये सिलेंडर साठी मोजावे लागणार आहेत. गॅसचे दर गगनाला भिडल्यामुळे घरगुती ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.