आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाचे सुयश.!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

नागरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या युथ जुनिअर व सीनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. भूमिका राजेंद्र मोहिते हिने 59 किलो वजनी गटात 79 किलो स्नॅच  व 106 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 185 किलो वजन उचलून ज्युनियर गटात कांस्यपदक जिंकले.

विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार  सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे  उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच हर्क्युलस जिमचे संचालक श्री. प्रदीप पाटील  जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव जिमखाना कर्मचारी याचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाच्या सर्व घटका मार्फत कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!