आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अमलझरी येथे महादेव मंदिराचे अहवाल पुस्तिका प्रकाशन सोहळा उत्साहात!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (20)

निपाणी जवळ असलेल्या अमलझरी गावात लोकवर्गणीतून पूर्णत्वास आलेल्या श्री महादेव मंदिराचा लेखा जोखा श्री महादेव सेवा संघाकडून मान्यवरांच्या उपस्थितीत व संतांच्या समोर महादेव मंदिर येथे सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव कंकनवाडे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता खोत, दत्तात्रय बाडकर, ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी कांबळे, राजेंद्र कौंदाडे, सिद्राम पुजारी, धर्मस्थळचे रामदास पाटील होते. प्रारंभी महादेवाच्या पिंडीला व नंदीला पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक करतांना महेश खोत यांनी आपल्या गावचे महादेव मंदिर पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी आर्थिक वस्तुरूपात, तसेचं माहेर वाशिनीनीं व गावातील युवा पिढीने वाढदिवसाची आठवण रहावी या हेतूने धार्मिक कार्यात आर्थिक मदत करून मंदिर पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याने मंदिर पूर्ण झाले. हे विसरून चालणार नाही.  याबद्दल या सर्वांचे आभार मानले. त्यानंतर मान्यवरांनी आपापल्या परीने मनोगत व्यक्त करतांना संघाच्या कार्याचा आढावा घेऊन या कमिटीने नेटकं नियोजन करून अहवालाच्या माध्यमातून कामाची पारदर्शकता लोकांच्या समोर मांडली याबद्दल कमिटीचे कौतुक केले. यावेळी मान्यवर म्हणाले की श्री महादेव सेवा संघाच्या प्रत्येक संचालकाने मंदिर बांधकामची जबाबदारी घेऊन कमी वेळेत ते पूर्ण करून ऐतिहासिक काम केलेलं आहे. याची जाणिव आपण सर्वानी ठेऊन मंदिराचे पवित्र्य टिकविणे हे आत्ता सर्व ग्रामस्थांचे काम आहे.

संघांचे सेक्रेटरी कृष्णात बाडकर यांनी अहवाल वाचन केले मंदिरासाठी एकूण वर्गणी 29,85,088/- खर्च 21,09909/- श्री शिल्लक 875179/- ही रक्कम मंदिराच्या पुढील कामासाठी वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संचालक कमिटीने पुष्पगुच्छ व पांढरी टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश खोत, वसंत रेपे, राजेंद्र कौंदाडे, मलगोंडा कंकनवाडे, रविंद्र मोहिते, चंद्रकांत खोत, राजेंद्र खोत, कुमार कंकनवाडे, उमेश खोत, दादासो पाटील, सुरेश खोत, अभिषेक स्वामी, पुजारी सुरज पाटील व संचालकं मंडळ तसेच ग्रामस्थ डॉ भीमराव खोत,अशोक खोत,अनिल खोत,भीमा पाटील,रामा रेपे, महादेव पाटील, निवृत्ती खोत, मारुती कदम, पंडित कदम, सुनिल कौंदाडे, अनिल कौंदाडे, सुरेश इंगळे, शांताराम कांबळे, आकाराम कांबळे, महादेव कांबळे, मायाप्पा गावडे, आशिष खोत, गणेश खोत, सतीश कंकनवाडे, निखिल रेपे, धीरज पाटील, प्रभाकर खोत, भैरू खोत, महिलावर्ग व बालचमु उपस्थित होते. सचिन कौंदाडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!